सिद्धांतसिंग मोहबे यांची सुवर्णमय कामगिरी
सिद्धांतसिंग मोहबे यांची सुवर्णमय कामगिरी राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी
नागपूर, ता. २६ : भद्रावती, चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत महालक्ष्मी उच्च प्राथमिक शाळा, नागपूरचा विद्यार्थी सिद्धांतसिंग संतोषसिंग मोहबे याने आपली उत्तम कामगिरी सादर करत ४८–५० किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले.
त्याने आपल्या जोरदार आणि प्रभावशाली पंचने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत स्पर्धेवर वर्चस्व सिद्ध केले. या यशामुळे सिद्धांतसिंग आता आगामी शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत शाळेचे नेतृत्व करणार आहे.
सिद्धांतसिंग हा क्रीडा संकुल, मानकापूर येथील बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी असून त्याच्या यशामध्ये त्यांच्या मार्गदर्शक गणेशजी पुरोहित आणि योगेशजी मिश्रा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा केंदे , संस्थेचे संचालक सुरेश हिरामण गायकवाड , तसेच सर्व शिक्षकवर्ग यांचे आशीर्वाद व प्रेरणा विद्यार्थ्यांना सातत्याने लाभत आहेत. संस्थेच्या व शाळेच्या वतीने सिद्धांतसिंग याला आगामी राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत सिद्धांतसिंगचे मोठे भाऊ खुशप्रीतसिंग मोहबे यांनी देखील १७ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत सहभाग नोंदवला. महालक्ष्मी उच्च प्राथमिक शाळेच्या या उज्ज्वल यशामुळे शाळेचे नाव उजळले असून, राज्यस्तरावरही हे यश कायम राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.
![]() |
अभिनंदन करताना मुख्याध्यापक ज्ञानोबा केंद्रे |
Siddhant Singh Mohabe's golden performance
Nagpur, : Mahalakshmi Higher Elementary School, Nagpur student Siddhant Singh Santosh Singh Mohabe won a gold medal in the 5-5 kg weight group in Bhadravati, Chandrapur recently.
He proved his strong and influential umpire to dominate the competition, surpassing the opponents. Due to this success, the Siddhant Singh will now lead the school in the upcoming school state level boxing competition.
Siddhant Singh is a student of the Boxing Training Center in Manakpur and his success was given the guidance of his guides Ganeshji Purohit and Yogeshji Mishra.
Gyanoba Kendra of the school, Suresh Hiraman Gaikwad, director of the organization, and the blessings and inspiration of all the teachers are constantly benefiting the students. On behalf of the organization and the school, Siddhartha Singh has greeted the upcoming state competition. Siddhant Singh's elder brother Khushapreet Singh Mohabe also participated in this competition by performing remarkable performance in the under -6 years. The brilliant success of the Mahalakshmi Higher Primary School has brightened the name of the school and all believes that this success will continue at the state level.
No comments